Marathi Kavita – Fitur – फितुर
कवि – सचिन सं. दि. तोटावाड
दाखवलेच त्यांनी,
ईमान किती आहे…
सोबतच राहुन,
खरे स्पर्धक तेच झाले…!
आपलेच ते होते,
आपलेच पाय ओढणारे
नेतृत्व मोठ होऊ नये,
म्हणुन जळणारे…!
नाही ते पतंग आम्ही,
हवेत करामती करणारे…
गळ्याला गळा लाऊन,
मांझाने गळा कापणारे…!
पुढे पुढे जाण्यासाठी,
काडीचा त्या आधार होता…
मदतीचा हात देण्यास,
खरच परका उभा होता…!
ज्याला आपल समजायचो,
त्यानेच पाठीत वार केला…
समोरासमोर न लढता,
पडद्यामागुन डाव केला…!
नवे नाही हे,
असतात आपलेच ते गद्दार…
परके असुनही साथ दिली,
तेच खरे साथीदार…!
बरेच काही शिकलो,
आपलेही ओळखलोय…
हार जीत होतच असते,
पण खुप काही जिंकलोय…!
हारलो म्हणजे,
त्यांचा शेवट होत नसतो…
स्वाभिमानाने शेवटपर्यंत,
संघर्षच तो खरा असतो…!!
✍️ सचिन सं. दि. तोटावाड
धानोरा खु. ता.धर्माबाद जि.नांदेड
sachin21totawad@gmail.com
खूप सुंदर लिहिलेलं आहे मला खूप आवडलं ❤️ पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा सर ☺️
फितुर – खुपचं छान कविता
कवी सचिन तोटावाड यांनी जीवनामध्ये जे काही शिकलो & शिकत आहे ते अनुभव खुपचं चांगल्या पद्धतीने कवितेमध्ये मांडले आहे.