Marathi Kavita – Social Media – सोशल मिडीया
कवि – सचिन सं.दि.तोटावाड
सध्या मी माणसं आता, बोटांवर चालताना पाहिलय…
आजकाल हे जीवन, सोशल मिडीयांवरच चाललंय…!
भल्या पहाटे उठल्यावर, GM नेच होतेय सुरुवात…
एकदा च ढकलला व्हाटसअॅपवरती, दिवसभरच निवांत…!
सर्वात आधी पोस्ट, अशी ही जणु पर्वणीच बनली…
माणसा ह्याने, आपल्यातली आपुलकी ताणली…!
काय ती शाॅर्ट भाषा, Gm,Gn तर कधी RIP…
असा कसा रे बनला, तु एवढा व्हीआयपी….!
वाढदिवस असला, वर्षाव शुभेच्छांचा होतो…
त्यालाच उत्तर, आभार प्रदर्शनाचा फेकतो…!
जयंती अन सण, खुपच उत्साहात साजरे…
अाॅनलाईन शुभेच्छा, अाॅनलाईनच साज रे….!
मित्र झाले हजार, पण आॅनलाईनच भेटायचे…
सुख आणि दुखातही, इमोजीनेच डोळे मिटायचे…!
म्हणुनच की काय, सेल्फीचा पर्याय आला…
फोटो स्वतःच काढण्याचा, हा काळ आला…!
झाला आता दुरावा, जीवन मिडीयाला वाहिलयं…
हो आजकालच हे जीवन, सोशल मिडीयावर चाललंय…!!
✍️ सचिन सं.दि.तोटावाड
धानोरा ख.ता.धर्माबाद जि.नांदेड
sachin21totawad@gmail.com
साहित्यिक श्री.सचिन टोतावाड यांनी खुप छान वास्तविकता समोर आणणारी ही कविता सादर केली आहे. आजकालची पिढी दैनंदिन आयुष्याचा हसत खेळत आनंद घेण्या ऐवजी सोशल मीडियाच्या जगात सर्रास वाहावत चालली आहे. सोशल मीडियाच्या सर्वांगीण पैलू उघडे करुन आपल्या कवितेतून प्रत्येक नागरिकाला सजग होण्याचा कटाक्ष डोळ्यासमोर ठेवून छान काव्य यांनी रचिले आहे…
खूपच छान.
सोशल मीडिया – खुपचं छान कविता
कवी सचिन तोटावाड यांनी सोशल मीडियाचे कवितेमध्ये खुपचं छान वर्णन केलं आहे.
कवितेमध्ये वास्तविकता सांगितली आहे.
खूपच छान आणि अप्रतिम वास्तविकता मांडली आहे.सोशल मीडिया ची खरच आहे .जेवढं हे सोपं सरळ आणि कामाचं साधन आहे .तेवढ्याच प्रमाणात हे माणसाला माणसापासून दूर नेत चालले आहे .खूप छान सर कवी तोटावड.