Marathi Kavita – Maay – माय
कवी – श्री दीपक अशोक चव्हाण
काटा लागे पायाला
वेदना होई मायेला
सपना मध्ये दुखी पाहून
म्हणे देवा सुखी ठेव माह्या लेकाला
दूर झाली
म्हतारपणाची काठी
माय करी चिंता
ऊन्हा तान्हात कबाडकष्ट करोनी
चटके सोसतात पाय
दोन घास भरवताना
लेकासाठी झुरते माय
पैसा आडका नको तिला
तुह्या जीवाची फार पर्वा
तळहाताच्या फोडासारखे
जपलय रे सर्वा
दोन श्ब्द प्रेमाची
माय असते भुकेली
म्हतारपणी लेका तिला
कारे सोडतो एकली
वृद्धाश्रमाचा विचार
मनातून सोड.
जप बाळा
मायेला जिवापाड
कवी ः श्री दीपक अशोक चव्हाण (प्राथमिक शिक्षक )
एफ विंग ६०४ सत्यम ओलीएंडर जांभुळ रोड
सर्वोदयनगरजवळ अंबरनाथ ४२१५०५
8180010335