
Marathi Kavita -Kuchambana – कुचंबणा
कवयित्री – मोनाली
आमचं आणि नशिबाचं सततचं वाकडं आहे
इकडेही वळव नजर जरा,देवा तुला साकडं आहे.
आम्ही असतो हुशार पण आमचा नसतो कुठेच वशिला,
तत्व येता आड ना लावत तूप कोणाच्या मिशीला.
हो ला म्हणतो ‘हो’ आणि ‘नाही’ ला सरळ नाही,
कुंपणावरच्या सरड्यासारखे सतत रंग बदलत नाही.
मानाने जी मिळते ती गोड मानतो भाकरी,
हॉंजी हॉंजी करून टिकवत नाही नोकरी.
दुर्मिळ होत्ये जात आमची, कर लवकर काही तरी
समाज तरी बदल वा ने आम्हा दिगंतरी.