
Marathi Kavita – Ranganchi Holi – रंगांची होळी
कवी – डॉ. नितीन गायकवाड
लातूर.
रंगांचं एकदा भांडण झालं,
एकमेकांवर रुसून झालं.
रंग कोणता दिसतो भारी?
या प्रश्नाने डोकंच हारी.
पांढरा म्हणाला काळ्याला,
मी आहे शांतीचा दूत.
काळ्याकुट्ट रंगाचा तू,
भयावह रात्रीचं भूत.
लाल म्हणाला पिवळ्याला,
काविळीसम रोगट तू.
कशास इतका मिजास करतो,
कुंकासोबत हळद तू .
भांडून कुठे प्रश्न सुटतो,
कुठे मिळतं मोठेपण.
मिळून मिसळून जगूया सारे,
उशिरा सुचलं शहाणपण.
रंग गुलाबी प्रेमाचा मी,
हिरवीगार वनराई तू.
निळ्या आभाळी शोभत राही,
इंद्रधनुष्य सतरंगी तू .
रंगांची ही भाषा न्यारी,
प्रत्येकाला अलगूज प्यारी.
होळीचे रंग, रंगांची होळी,
साजरी करूया दारोदारी.
Auto Amazon Links: No products found.









खूपच सुंदर कविता आहे.
रंगामधून जीवनाचा अर्थ सांगणारी कविता
निरनिराळ्या रंगातून आनंदाचा एकच रंग रंगवणारी सुंदर कविता
Jabardast Kavita
[…] रंगांची होळी – डॉ. नितीन गायकवाड […]