माझी ओंजळ – Marathi Katha Mazhi Onjal

0
1675

Marathi-Katha-Majhi-Onjal

लेखिका – प्राजक्ता बोवलेकर
संपर्क – prajaktabovlekar@gmail.com

माझी ओंजळ – Marathi Katha Mazhi Onjal

‘हॅलो’ मी बोलतो आहे. कशी आहेस? आणि काय ग एवढे दिवस झ्हाले तुझा फोन पण नाही. प्लीझ असं नको करूस.’

नाही रे हल्ली वेळ च मिळत नाही. आणि हो फोन करून तरी रोज काय बोलणार? ओके ते जाऊदे फोन का केलास?

सहज च ग म्हटलं बोलावं तुझ्याशी.

प्रांजळ आणि चिन्मय चा फोन वर संवाद चाललेला.

‘प्रांजळ’ नावा प्रमाणेच प्रांजळ. साधी,हसरी, ही मुलगी जणू काही दुसऱ्याचा च विचार करणारी. मित्र- मैत्रिणींमध्ये पण हवी हवीशी वाटणारी. कोणीही सहज पणे तिची मैत्री स्वीकारायचा.

चिन्मय सुद्धा प्रांजल चा एक चांगला मित्र. दोघांना पण एकमेकांशी बोलायला फार आवडायचं. पण हल्ली प्रांजल ला या सगळ्याचा खूप कंटाळा आलेला. मन कशातच रमत नव्हत. तिला सगळ्याचा वीट आलेला .

कधीतरी तिला वाटायचं सगळं असून पण ती अपूर्ण च आहे,हल्ली तर तिच्या घरी तिच्या भावी जीवन साथी चा शोध चालू आहे. पण त्यात सुद्धा तिला रस वाटत नाही.

चिन्मयशी पण रोज तेच तेच बोलून तिचे कान विटलेले. खूप अस्वस्थता वाटते. पण ती चिन्मय ला काहीच बोलत नव्हती. कारण तिला त्यालाच काई पण इतर कोणालाच स्वतःसाठी त्रास द्यायचा नसतो.

अशा वेळी एकदा ती जेऊन शांत पहुडलेली असते त्याच क्षणी  ‘तो’ मनात डोकावून जातो. तिला क्षणात सर्व चित्र समोर दिसू लागत.

किती अल्लड वय होता ते. त्यावेळी प्रांजल मनसोक्त हसायची, बगाडायची, सगळंच तिला मिळत होत अस नाही. पण जे होत ते तिच्या साठी खूप होता. असा तिला वाटायचं.

अशाच वेळी तिच्या नकळतच तो तीच्या आयुष्यात डोकावतो. तीला काहीच कळत नाही. तीला तेव्हा काहीच वाटायचं नाही. ‘ तो ‘ नकळत तिच्या आयुष्यात डोकावतो. तिला काहीच नाही वाटायचं. तो सतत तिच्या अवती भवती असायचा अगदी मनापासून. पण तिला ते कधी जाणवलच नाही. तो अजाणता राहून तिच्या साठी खूप काही करायचा.

प्रांजल अगदी हक्काने मैत्रीच्या नात्याने त्याची मदत मागायची. किती सहज जीवन होता ते.

एके दिवशी तिला जाणवते कि तो तिच्या जीवनात जास्तच येत होत. तेव्हा तिनेच तिच्या मनात नसताना त्याच्याशी  अबोला धरला. जणू काही  स्वतःच्या सावली पासून स्वतःला च वेगळा करावा आस ती वागली.

तो सुद्धा स्वतःची “ओंजळ” रिकामी ठेऊन तिच्या भरलेल्या ओंजळीतून दूर गेला. ती खूप आनंदी झालेली. जणू काही आषाढा मधला कंटाळा जाऊन श्रावणातील हिरवळ  यावी.

त्याने सुद्धा स्वतःहून मनात नसताना माघार घेतली. जणू काही झाडावर नवी पालवी आल्यावर जुन्या पानाने अलगद खाली पडाव तसं.

वर्षामागून वर्ष गेली, ऋतू मागून ऋतू गेले. मनातला एक कोपरा तिच्याच साठी ठेऊन त्याने आपला नवीन संसार थाटला.

प्रांजल च्या तर ध्यानी मनातून ही तो गेलेला. त्याच्यावर च स्वार्थी पणाचा ठपका लावून ती विसरू लागली. पण आज ती खूपच अस्वस्थ झाली.

आज तिला जाणवलं कि “जे मला हव होत तेच मला मिळालं होत, पण मलाच ते घेता आल नाही.” का मी माझं सर्वस्व सोडून दिलं.

आज तिच्या घरी अनेक मागण्या येतात. त्यातून ती तिच्या घरच्यां सह अनोळखीतून ओळखीचा शोधत आहे.

जेव्हा तिच्या आयुष्यात ओळखीचा चेहरा होता त्याला तिने सहज अनोळखी केलं.
आजही कधीतरी तो तिच्या समोर येतो. हलकेच फुंकर मारावी तशी तिची विचारपूस करतो. पण प्रांजल ला तो एक अनोळखीच भासतो. तिला खूप वाटत कि एकदा तरी त्याला लटकच रागावून विचारावं का? माझी ओंजळ अपूर्ण ठेवलीस? त्यातला सुंगध च तू का  घेऊन गेलास? आता मी जणू काही माझ्या भरलेल्या ओंजळी साठी एक अनोळखी गंध शोधते आहे.

मला तो गंध मिळेलही पण त्या गंधाने माझी “ओंजळ” चैत्रातल्या पालवी प्रमाणे प्रफ्फुल्लीत होईल कि वैशाखातल्या वणव्या प्रमाणे करपून निघेल.

खरंच “माझी ओंजळ” माझीच राहिली.

असं म्हणून प्रांजल ने अश्रूंना वाट करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here