तब्बल १२ वर्षानी हास्यसम्राट मकरंद अनासपूरे यांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर प्रदर्पण केले ते याच नाटकातून..
सुयोग निर्मित केशवा माधवा…
नुकतेच या नाटकाचे १०० पेक्षा अधिक प्रयोग यशस्वी रित्या पूर्ण झाले…
सचिन खेडेकर यांच्या “कांजी विरुद्ध कांजी” या गुजराती नाटकावर केशवा माधवा आधारित आहे.. “कांजी विरुद्ध कांजी” या नाटकाने देखील गुजराती रंगभूमीवर ५०० प्रयोगांचा टप्पा ओलांडला होता..
सध्या हे नाटक हिन्दी रंगभूमीवर परेश रावल साकारत आहेत …… “कृष्णा वर्सेस कन्हाया” या नावाने..
या नाटकाने…५२ हाऊसफूल खेळ फक्त ५० दिवसात केले…
या नाटकाची लोकप्रियता पाहून…सुयोगने हे नाटक मराठी मध्ये आणण्याचा निर्णय घेतला..
केशवा माधवा हे नाटक म्हणजे कथा आहे…एका नास्तिक माणसाची…
देव आहे की नाही? या प्रश्नावर आधारित हे नाटक….
या नाटकातील नायक मकरंद अनासपूरे यांचे … साधे सरळ प्रश्न …जे सर्वांना पडतात…
पण शक्यतो असे लोक फार कमी….जे ठाम पणे या प्रश्नांची उत्तरे शोधतात….
या नाटकातील नायक काहीसा असाच….
काय होते या नायकाचे…. देव खरेच आहे की नाही…
आणि जर असेल तर तो नाटकाच्या नायकाला भेटतो का…
या प्रश्नाची उत्तरे विनोदाच्या शैलीत शोधत नाटकाचा प्रवास सुरू होतो…..
हे नाटक विनोदी असले तरी हे एका गंभीर विषयावर बोलणारे नाटक आहे..
देवाच्या नावाने चालणार्या रूढी परंपरा यांच्या बरोबरच, मंदिरान मध्ये केली जाणारी दाने… देवाच्या नावाने पैसे कमावण्यासाठी सुरू झालेला व्यवसाय…
या वर उत्कृष्ट शैलीत भाष्य करण्यात आले आहे…
तर देव खरच आहे की नाही… या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी नक्की पहा….
सुयोग निर्मित केशवा माधवा…
केशवा माधवा वर आधारित झी मराठी वरील हाऊसफूल कार्यक्रमाचा भाग…
[tube]M1m1K00VZKw[/tube]