Dassera Celebration in Mumbai Local – दसरा – मुंबई लोकल मधला.

0
1546

मुंबई लोकल, म्हणजे मुंबई उपनगरात राहणाऱ्या आणि मुंबई नोकरी करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या आपुलकीची. म्हणूनच मुंबई लोकल ला मुंबईची लाइफ लाईन म्हटले जाते.

dessera in mumbai local

रोज ती ५ ते १० मिनिटे उशिरा असते, आजची गर्दी काळ पेक्षा नेहमीच जास्त असते, अनेकदा भांडणे होतात, काही मिटतात तर काही अगदी मारा मारी पर्यंत जातात. लोकल मध्ये चढताना आणि उतरताना प्रत्येकाला दुसर्याच्या आधी जायचे असते. त्यासाठी नकळत तो पुढच्याला जोरात ढकलत सुद्धा असतो. पण काहीही असले तरी मुंबई लोकल हि प्रत्येक प्रवाश्याच्या आपुलकीची असते. या लोकल प्रवासात अनेक मित्र बनतात कित्तेकांची नावे माहित नसतात पण चेहरा ओळखीचा वाटतो, अनेक जण तर त्याच्या रोजच्या बसण्याच्या जागे वरून ओळखले जातात. आज एकमेकांना ओळखत नसणारे काहीच दिवसात एकमेकांना जागा द्यायला लागतात. खोपोली कर्जत बदलापूर वरून प्रवास करणारे सकाळी मुंबई कडे जाताना ठाण्याला स्वताहून उठून इतरांना जागा देतात, तर मुंबई वरून संध्याकाळी येताना मुंबई वरून आलेले प्रवासी ठाण्याला उभेराहून त्याची परतफेड करतात. रोजच्या कामाच्य व्यापात हीच मुंबई लोकल एक रीफ्रेशमेंट ठरते.

दसर्याला शास्त्रांची पूजा केली जाते, ज्या शस्त्रांशिवाय आपण आपे काम करू शकत नाही अश्या सर्व शास्त्रांची. मग मुंबई लोकल शिवाय एकही उपनगरातील प्रवासी त्याच्या कामाच्या जागी म्हणजेचे स्वप्न नगरी मुंबईमध्ये पोहचू शकत नाही. म्हणूनच मुंबई उपनगरातून मुंबई कडे रोज प्रवास करणारे प्रवासी दसर्याच्या आदल्या दिवशी(कारण दसर्याच्या दिवशी सर्वाना सुट्टी असते) मुंबई लोकल मध्ये दसरा साजरा करून आपल्या मुंबई लोकल विषयीच्या भावना व्यक्त करतात.

या दिवशी मुंबई लोकलला संपूर्ण सजवले जाते, यासाठी फुलांचा पताकांचावापर केला जातो. गाडी मध्ये देवीच्या फोटोची पूजा आणि आरती केली जाते, त्यानंतर अल्पोपहार केला जातो. पण हे सर्व करताना सामाजिक जाणिवेचे भान ठेवून  होणारा सर्व कचरा जमा करून मुंबई मध्ये उतरणारा प्रवासी तो आपल्या सोबत घेऊन जातो आणि स्थानकावरील कचर्याच्या डब्यात टाकतो.

असा साजरा होणारा मुंबई लोकल मधला दसरा आपण पाहूया मराठीबोलीच्या युट्युब वाहिनीवर.

मुंबई लोकल मधील दसर्या मध्ये आपण कधी भाग घेतला असेल तर आपले अनुभव खाली कमेंट करून सांगा, आणि नसेल घेतला तर वरील व्हिडीओ मधील दसरा आपल्याला कसा वाटला ते आम्हाला सांगा.

आणि हो मराठीबोलीच्या युट्युब वाहिनीला मोफत सबस्क्राइब करायला विसरू नका.

https://www.youtube.com/channel/UCrGVTObaHzQBPS5RadaMxuQ

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here