सामान्यांच्या न्यायासाठी, एक निखारा पेटला
अन्यायाला भस्म करीत हा, गगनाला हो भिडला
सांगलीतील बोरगावात, कहाणी रचली हो ज्याने
अश्वारूढ होऊनी बंदुक, हाती घेतली हो ज्याने
घरदार स्वतःचे सोडूनी, संसार त्यागिला ज्याने
रक्तरंजित क्रांतीचा हो, इतिहास घडविला ज्याने
अन्यायकर्त्या कोणासही, कधी न बक्षिले ज्याने
मृत्यू दंडानिशी त्यांना, यमसदनी धाडिले ज्याने
अन्यायकर्त्या पुत्रालाही, सम-शासन हो ज्याचे
वेळ येता त्या प्रिय पुत्रावरही, मृत्यू वार हो ज्याचे
थंडावले अन्यायाचे स्तोम, प्रयत्नाने हो ज्याच्या
सुखी अनेक संसार हो झाले, आशीर्वादाने ज्याच्या
अन्यायाविरुध्द लढण्याचे, सामर्थ्य दिले हो ज्याने
कायदयाच्या जन्मठेपेची, शिक्षाही भोगली ज्याने
स्वाभिमानी हरेक मन, गाती गुणगाण जयाचे
बापू बिरू वाटेगावकर, नाव असती तयाचे !!!
– मिलिंद डोंबाळे (देशमुख)