Aniket Vishwasrao – अनिकेत विश्वासराव
दहिसरला राहणारा अनिकेत, बोरिवलीला सेंट. फ्रान्सीस उच्चमाध्यमिक शाळेत होता..तेव्हा पासूनच त्याला अभिनयाची आवड. पण त्याचा अभिनया कडे खरा प्रवास सुरु झाला तो एम.एल.डहाणूकर कॉलेज, विलेपार्ले मधून..
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात अगदी तसच त्याची प्रमुख भूमिका असलेली त्याची पहिली मालीका “नायक” आपण पाहिलीच आहे . ‘उन- पाऊस ‘ आणि ‘कळत नकळत ‘ सारख्या मालिकेतून तो घराघरात पोहोचला आणि त्याच्या अभिनयाचे गुण आपल्याला पाहायला मिळाले . गिल्टी , फक्त लढ म्हणा , हवा आने दे , आघात , नो एन्ट्री -पुढे धोका आहे यासारख्या सिनेमातून अनिकेत त्याच्या स्टाइल ने तर अनेक तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
त्याचा आलेला ‘ ब्रेकप के बाद ‘ या व्हीडिओने तर प्रत्येकाच्या मनात जागा मिळवली तर आहेच त्याच बरोबर अनेकांच्या ब्रेकप च्या आठवणीही ताज्या केल्या आहेत .
मराठी नाटकामध्ये त्याला पहिला ब्रेक मिळाला तो हृषीकेश जोशी ,सुधीर भट यांच्यामुळे . विक्रम गोखलेन बरोबर असलेल्या ‘ ब्यारीस्टर ‘ नाटकाने तर अनिकेतला खूप काही शिकवले असतो म्हणतो .
HIII
Comments are closed.