
Marathi Kavita – Bonas – बोनस
कवयित्री – डॉ. शुभदा गद्रे
भटकून झाले देशोदेशी
खूप भ्रमंती झाली
काय सवे न्यायचे तयाची
यादी पाठच झाली
कसे जायचे, कोण सोबती
पहावयाचे काय ?
आरक्षण करण्या पैशांचीही
करावयाची सोय
सारे काही ठरीव आखीव
प्रियजनांना ज्ञात
परतायचे तेथून कधी ती
निश्चीत असते डेट
असेच माझे आणि तुमचे
किती प्रवास झाले
तनामनाला किती वाहिले
उपभोगांचे शेले
एकच यात्रा असे राहिली
जिला नियोजन नाही
कुठे, कसे नि कधी जायचे
ज्ञात कुणाला नाही
लागत नाही आरक्षण आधी
नसे न्यायचे काही
आणायच्या वस्तूंची यादी
कधीच लागत नाही
कपर्दिकेचा खर्च नसे नि
वाटखर्ची ना लागतसे
तकतक टेन्शन ना डोक्याला
आपसुख सारे होत असे
महाजालावर नसे माहिती
प्रवासवर्णने ना कुणी लिहिली
अज्ञाताची मुशाफिरी ही
रहस्याच्या धुक्यातली
किती मजा नि थ्रील किती ते
नसे मागणी कुठली पहा
भरपूर जीवन जगल्यानंतर
वरती खासा बोनस हा
वरती खासा बोनस हा
————————————————————- डॉ. शुभदा गद्रे
बी २१, कृतिका
डहाणूकर कॉलनी, कोथरूड
पुणे , ४११०३८
Auto Amazon Links: No products found.









Realise the bonus more after surviving covid times.
Bonus is being blessed.
Beautiful journey traced.
I would cancel the trip and return the bonus. Keep planning my life, as long as I can.
महाजालावर नसे माहिती, प्रवासवर्णने ना कुणी लिहिली- असा अगम्य प्रवास हा .. कल्पना छान व्यक्त केली आहे.
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-73/ […]