Marathi Kavita – Sanyasta – संन्यस्त
कवयित्री – नुतन नागरगोजे
अनंत अनादी रूप तुझे,
देह तुझ्या सहवासातला
उत्तरे कैक गवसली,
पण प्रश्न अधुराच राहिला …..
रात किड्याच्या ध्वनीने,
पुरा आसमंत निनादला
कणाकणांत असे तुच रे,
नको जाऊ दूर देशी मना…..
सोबती कित्येक नक्षत्रमाळा,
परी चंद्र अर्धाच राहिला
वैरागी ह्या रात्रीचा,
अंधारही आज सन्यस्त झाला……
नुतन नागरगोजे……