कवी – सर्वेश
संपर्क – yallappakumbhar82@gmail.com
मनाचा वारू- Marathi Kavita Manacha Varu
उधळला मनाचा बेभाण वारु निसटला कसा हा नको ना विचारु //ध्रु //
देत जोर हिसका हा बंध तोडू पाही
सुसाट स्वैर धावे गाठावयास कांही
बेचैन होऊनी उगाच लागे हा बिथरु //१//
रंग हे नवे नवे,सदाच त्या हवे हवे
आकाश ही निळे निळे धरेस जाऊनी मिळे
विस्मयी लहरित त्या लागे हा विहरु //२//
मनी शहारले कसे त्रुणींचे फूल लाजरे
म्रुदूल ओठ उघडिता मंद स्मित पाझरे
अवचित खुलुनी तसा लागे हा बहरु //३//
सुगंध कुठे दाटला,भास सुखद जाहला
हुरळुनी अन् मोद भरें क्षणी स्तब्ध जाहला
होत तरल धुंद सुखे लागे हा लहरु//४//