Marathi kavita – भारतरत्न ते देशाचे…जय भिम !

2
40997

Marathi kavita – भारतरत्न ते देशाचे…जय भिम !

Marathi Kavita Ambedkar

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(१४ एप्रिल १८९१ – ०६ डिसेंबर १९५६)

शिल्पकार ते घटनेचे,
उद्धारक ते उपेक्षितांचे,
विरोधक ते वर्णभेदाचे,
भारतरत्न ते देशाचे…जय भिम !

दूत ते शांतीचे,
प्रचारक ते समतेचे,
प्रसारक ते धम्माचे,
भारतरत्न ते देशाचे…जय भिम !

सागर ते ज्ञानाचे,
पंडित ते कायद्याचे,
अभिमान ते भारतीयांचे,
भारतरत्न ते देशाचे…जय भिम !

– मिलिंद डोंबाळे (देशमुख)

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here