TimePass Marathi Movie review – मराठी चित्रपट टाइमपास

0
3274

TimePass Marathi Movie review – मराठी चित्रपट टाइमपास

Timepass marathi Movie review

निर्मिती  : झी टॉकीज , एस्सेल विजन आणि अथांश कम्युनिकेशन.
दिग्दर्शक : रवी जाधव
कलाकार : प्रथमेश परब, केतकी माटेगावकर , वैभव मांगले, भालचंद्र(भाऊ) कदम  , आरती, मनमित, ओंकार राऊत, जएष चव्हाण, अनविता फलटणकर , मेघना एरंडे, उर्मिला कानीटकर , भूषण प्रधान ,  उदय सबनीस, शशांक केवले , सुप्रिया पाठारे, संपदा जोगळेकर
कथा  : रवी जाधव
संवाद : प्रियदर्शन जाधव , रवी जाधव
फोटोग्राफी दिग्दर्शन : वासूदेव राणे
एडिटर : जयंत जथार, नितेश राठोड
नृत्य दिग्दर्शन  : उमेश जाधव
कला दिग्दर्शन: संतोष फुटाणे
संगीत : चिनार आणि महेश
गाणी  : गुरु ठाकुर , अश्विनी शेंडे , मंगेश कंगाने
प्रदर्शन दिनांक : ३ जानेवारी २०१४

बालक पालक म्हणजेच बीपी नंतर दिग्दर्शक रवी जाधव यांचा टीपी म्हणजेच टाइमपास हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

चित्रपटातील दोन मुख्य भूमिका दगडू(प्रथमेश परब) आणि प्राजक्ता (केतकी माटेगावकर) दोघांचाही अभिनय उत्तम, प्रथमेश ने रंगवलेला दगडू हा बालक पालक चित्रपटातील  विशु सारखाच आहे.

चित्रपटाची सुरुवात एकदम मनोरंजक, सुरुवातीच्या पाच मिनिटातच चित्रपट रसिकांना पोट धरून हसवतो आणि रसिकांना चित्रपटात गुंतवतो. दगडूचे संवाद, अभिनय,  दगडूचे प्राजक्ताला भेटण्याचे प्रयत्न आणि प्राजक्ताचा सुंदर सोज्वळ लुक मध्यंतरा पर्यन्त रसिकांचे धमाल मनोरंजन करतो पण मध्यंतरा नंतर चित्रपट थोडा संथ भासतो.

चित्रपटाचा शेवट शाळा चित्रपटाची आठवण करून देतो. चित्रपटातील उर्मिला कानीटकर आणि भूषण प्रधान यांचा अभिनय देखील उत्तम.

चित्रपटातील भालचंद्र कदम म्हणजेच दगडूचे वडील यांची भूमिका उत्तम, यांचे संवादही उत्तम आहेत, वैभव मांगले यांचा अभिनय देखील उत्तम.

चित्रपटाला चिनार आणि महेश या जोडीने उत्तम संगीत दिले आहे, गुरु ठाकुर यांची शब्द रचना देखील उत्तम.  मला वेड लागले प्रेमाचे आणि फुलपाखरू ही दोन्ही गाणी मनोरंजक.

चित्रपटाचा शेवट विनोदी करण्याच्या नादात थोडासा भरकटल्या सारखा वाटतो, दगडू  शेवटी जेव्हा प्राजकताच्या घरी सर्वांना भेटायला येतो तेव्हा तिथे घडणारे संवाद ओढून ताणून विनोदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्या ऐवजी तिथे काही संदेश देता आला असता.

चित्रपटाला स्वतःची अशी कथा नाही, पण चित्रपट मनोरंजन करण्यात यशस्वी होतो… म्हणजेच पूर्ण टाइमपास.

चित्रपटाची कथा:

दगडू परब ( प्रथमेश परब ) हा दहावीत नापास झाल्यानंतर त्याचे वडील(भाऊ कदम) हे त्याला घरातून बाहेर काढतात, त्यानंतर पैसे कमावण्यासाठी दगडू घरोघरी पेपर टाकण्याचे काम स्वीकारतो, आयुष्यात काहीतरी टाइमपास म्हणजेच प्रेम असावे असे दगडूच्या मित्रांचे मत असते. यातूनच दगडूच्या समोर प्राजक्ता(केतकी माटेगावकर) येते आणि दगडूचा त्याचे प्रेम मिळवण्यासाठीचा खेळ सुरू होतो.

काय दगडूला मिळेले प्राजक्ताचे प्रेम? की दगडूचे स्वप्न अर्धेच राहील? हे समजून घेण्यासाठी पहा टाइमपास..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here