Mala Ved Lagale Premache – TimePass, Marathi Song Lyrics – मला वेड लागले प्रेमाचे

1
Posted December 31, 2013 by Swapnil Samel in मनोरंजन

मराठीबोली वरील लेख ईमेल द्वारे मिळवण्यासाठी ईमेल आयडी द्या.


Mala Ved Lagale Premache – TimePass, Marathi Song Lyrics – मला वेड लागले प्रेमाचे

mala-ved-lagle-premache-timepass

बालक पालक या चित्रपटाच्या यशा नंतर दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा पहिल्या प्रेमाची कथा रसिकांसमोर सादर करीत आहेत, त्यांच्या आगामी चित्रपट टाइमपास मधून.

चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत, गाण्यांना संगीत दिले आहे चिनार-महेश यांनी तर गाण्यांचे बोल लिहिले आहेत गुरु ठाकुर यांनी.

टाइमपास या चित्रपटातील … मला वेड लागले प्रेमाचे … या गाण्याचे बोल.

 

रंग बावर्या स्वप्नांना .. सांगा रे सांगा
कुंद कळ्यांना वेलींना .. सांगा रे सांगा
हे ध्यास ओठी कसे .. हे रंग ओठी कुणाचे
का संग वेड्या मना.. मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे .. प्रेमाचे

नादावले धुन्धावले .. कधी गुंतले मंन बावळे
नकळे कधी कोणामुळे .. सूर लागले मन मोकळे
हा भास कि तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे .. प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला .. कुणी भेटला माझा मला
खुलत काळी उमलून हा .. मन मोगरा गंधाळला
हा भास कि तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे .. प्रेमाचे

रवी जाधव दिग्दर्शित टाइमपास चित्रपट ३ जानेवारी २०१४ ल प्रदर्शित होत आहे.About the Author

Swapnil Samel


One Comment


 1.  
  vishal

  very nice song
  mala mahit navte pan mazya honarya misses ne sangitale teva
  baghital very very nice
  keep it up

Leave a Response

(required)