
कवयित्री : डॉ. लता मुळे पाडेकर
संपर्क : latapadekar@gmail.com
स्वच्छ भारत अभियान – Marathi Kavita Swatchchh Bharat Abhiyan
भारत भू ची वाढवू शान ठेवूनी जगात ताठ मान
मिळूनी सारे हाती घेऊ स्वच्छ भारत अभियान…धृ…
आरंभ करू या घरापासूनी मग आपुला शेजार
रस्ते, गल्ल्या, चौक, बागा भरतो जिथे बाजार
निर्मळ ठेवू परिसर आपला दिसेल ना हो छान …१…
ओला आणि सुका कचरा करू वेगवेगळा
पर्यावरण रक्षणाचा असे मार्ग हा आगळा
जिरवू कचरा फुलवू बागा सुपीक करू हो रान…२…
सदा आम्हासी वंद्य आमुचे जवान अाणि किसान
प्रणाम सफाई कामगारांना कार्य तयांचेही महान
प्रत्येकजण सामील होऊ स्वीकारू हो आव्हान…३…
डॉ. लता मुळे पाडेकर
Auto Amazon Links: No products found. Blocked by captcha.








