Shrimanyogi Marathi Novel by Ranjeet Desai – श्रीमानयोगी – रणजीत देसाई

0
2027

Shrimanyogi Marathi Novel by Ranjeet Desai – श्रीमानयोगी – रणजीत देसाई

Shrimanyogi Marathi Novel by Ranjeet Desai

 

शिवचरित्राचे भव्योदात्त उत्कट चित्रण करणारी ही कादंबरी.

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी । यशवन्त कीर्तिवंत । सामथ्र्यवंत वरदवंत । पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा । समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श. मराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ. इतका अष्टपौलू, अष्टावधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण. पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामथ्र्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे. मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांमधूनदेखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते. शिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पौलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या, हताश झालेल्या समाजमनाला खडबडून जाग आणण्याचे सामथ्र्य फक्त शिवचरित्रातच आहे.

श्रीमनयोगी ही कादंबरी सवलतीच्या दरात घरपोच मिळवण्यासाठी क्लिक करा.

रणजीत देसाई यांच्या इतर कादंबर्‍या विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here