:- Recipe Soyabean Cutlet
Source: http://rucheera.blogspot.in
साहित्य :
-
अर्धा कप सोया ग्रनुअल्स
-
अर्धा कप उकडलेले मुग
-
एक उकडलेला बटाटा
-
पाव कप बारीक चिरलेला कांदा
-
एक टी स्पून गरम मसाला
-
बारीक चिरलेली कोथिंबीर
-
चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ
-
थोडा रवा
-
तेल
कृती :
-
सोया ग्रनुअल्स शिजवून घेऊन त्यातले पाणी काढून टाका. बटाटा चांगला मॅश करून घ्या.
-
एका पसरट भांड्यामध्ये सोया ग्रनुअल्स, मुग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
-
एका बाजूला नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा. तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून दाबून त्यांना कटलेट चा आकार द्या.
-
एका प्लेट मध्ये रवा पसरवा. त्या रव्यावर कटलेट ठेवून कटलेट दाबा म्हणजे रवा कटलेट ला चांगला लागेल. हा रवा कटलेट च्या दोनही बाजूना लावा.
-
गरम झालेल्या तव्यावर तेल टाकून हे कटलेट त्यावर दोनही बाजूने तांबूस होईपर्यंत भाजा.
-
हे गरमागरम कट्लेट कुठल्याही सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या.अधिक रेसिपीस साठी भेट द्या .. http://rucheera.blogspot.in