Rape: बलात्कार … स्त्री ची कमजोरता की पुरुषाची लैगिकता

4
98414

Rape: बलात्कार … स्त्री ची कमजोरता की पुरुषाची लैगिकता

Delhi rape

खूप दिवस विचार करत होतो, या विषयावर लिहावे की..नको…

पण आजच्या वर्तमान पत्रात पुन्हा एकदा बातम्या वाचल्या…

“जुहू मध्ये एका ३वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बस मध्ये बलात्कार”

“नागपुर मध्ये दरडेखोरांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार”…

आणि स्वताला रोखूच नाही शकलो..

रोज नुसते बलात्कार बलात्कार आणि बलात्कारच….

या वासनान्ध राक्षसांपासुन आपला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र देखील वाचू शकला नाही….

नुकताच दिल्लीतिल त्या काळ्या घटनेला एक महिना पूर्ण झाला… मेणबत्ती मोर्चा काढून किती आणि काय परिणाम होतो माला नाही माहीत… पण दिल्लीकरांची एकी यातून देशासमोर आली.

काही महाभागांनी यावर उपाय देखील सुचवले…

……मिरचीची पावडर आणि चाकू…

……देवाचा धावा…..

काहींनी तर याला मुलींना जबाबदार धरले…”मुलींचे तोकडे कपडे…”…..

असो..

[quote]सुंदर मुलगी रस्त्यावरून नग्न देखील जात असेल तरी…इतरांना तिच्यावर बलात्कार करण्याचा काय अधिकार…?[/quote]

 

अनेकांनी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या…असा हट्ट धरला…

पण खरेच या पाच जणांना फाशी देऊन हा प्रश्न सुटणार आहे…. अर्थात मी देखील या नराधमाना फाशीच व्हावी याच बाजूचा…

पण प्रश्न हा आहे…की यांना किंवा इतर बलात्कार्‍यांना फाशी देवून असे गुन्हे थांबवता येतील?

यासाठी कारणीभूत दोनच गोष्टी एक म्हणजे स्त्रियांचा कमजोरपणा आणि पुरुषांची लैगिकता किंवा वासना…

बलात्कार टाळण्यासाठी स्त्रियांना अधिक सक्षम होण्याची गरज आहे.. कोणत्याही हत्यारा शिवाय…. कारण हत्यार कोणतेही असो… मिरचीची पूड, चाकू किंवा बंदूक… ती योग्यवेळी वापरण्याची हिम्मत मनगटात असावी लागते…

पुरुषांची लैगिकता किंवा वासना…. यावर खूप कमी जण बोलताना दिसतात…

अश्या गुन्हयांसाठी सगळ्यात जास्त प्रमाणात जबाबदार असते ती म्हणजे पुरुषांची लैगिकता किंवा वासना…

वासना म्हणजे एक प्रकारची भुकच आहे… जशी अन्नाची…तशी ही वासनेची…

स्त्रियांना जसे सक्षम करण्याची गरज आहे ..तशीच पुरुषांची ही वसानेची भूक देखील कमी होणे गरजेचे आहे…

ही भूक जेव्हा अनावर होते आणि समोर एखादी कमजोर स्त्री आढळते….तेव्हा हा वासनान्ध पुरुष काय करून बसतो हे त्याचे त्यालाच कळत नाही…. अश्यातच जर अश्या वासनान्ध पुरुषांची टोळीच असेल तर….

ही भूक अगदी रस्त्यावर असणार्‍या रोड रोमिओ पासून ते कॉर्पोरेट पर्यन्त सगळ्यांमधेच असते…

स्वताला विचारून बघा…. तुमच्याच मित्रपरिवारात अस भुकेला आणि डोळ्यांनी बलात्कार करणारा एखादा असतोच…

ही वृत्ती बदलण्याची गरज आहे…

स्त्रियांना पुन्हा एकदा झाशीची रानी बनण्याची गरज आहे… त्रास देणारा कोणीही असेल रोड रोमिओ किंवा तुमचा बॉस त्याच्या या कृतीला कधीच नजर अंदाज करू नका…

वेळीच त्यांच्यातील अश्या भावना संपवून टाका…नाहीतर त्या भावना वाढतच राहतात…

अश्या गुन्हेगारापासून तुम्ही स्वताच स्वताचे रक्षण करू शकता….

4 COMMENTS

  1. व्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ इतरांचा पाणउतारा करण्याचा हक्क असा लावला जात असल्याने बलात्काराच्या घटनातच नव्हे तर सर्वच व्यक्तिविशिष्ट गुन्ह्यात वाढ झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here