नेहमीच आड वाटेवरील सिनेमा म्हणजेच…वळू, विहीर , देऊळ असे चित्रपट देणाऱ्या निखील महाजनांचा(Nikhil Mahjan) हा चित्रपट…
पुणे ५२ म्हणजे अमर आपटे या १९९२ सालातील पुण्यामधील एका खाजगी गुप्तहेराची कथा.
त्याच्या समोर आलेल्या एका CASE मुळे त्याच्या आयुष्यात अनेक नाटकीय बदल येतात…
त्याचीच ही कहाणी…
पुणे ५२ चित्रपट अमर आपटे, प्राची आपटे आणि नेहा….या तिघांची गोष्ट..
अमर आपटे(गिरीश कुलकर्णी) आणि त्याची बायको प्राची आपटे(सोनाली कुलकर्णी) यांच्यात अनेकदा वाद होतात, कारण प्राची स्वता सांगते “बायकांना असले निर्धन गुप्तहेर आवडत नाहीत.”.
अमर हा स्वतमध्येच गोंधळलेला अस्वस्थ…. उत्तरांमधून प्रश्न शोधणारा…आणि त्यात गोंधळून जाणारा…
सारखा कॅमेरा घेऊन स्कूटर वर फिरणारा…
त्यात बायको देखील समजून घेत नसल्यामुळे….अधिकच अस्वस्थ होणारा…. सुख शोधणारा…
आश्यातच अमरला नेहा(सई ताम्हणकर) भेटते….. सुंदर आणि एकटी…
मग सुरू होतो खेळ….अमर नेहा आणि प्राची….
अमर चे नेहा वर प्रेम आहे…??
की नाही…. यासाठी पहा…पुणे ५२.