आज लिहित आहे एका योद्ध्या पद्धल…जो आज पण लढतच आहे…
आजची त्याची लढाई पण आहे…आपल्या साठीच…प्रत्येक मराठी माणसासाठी…आज तो लढतोय मृत्यूशी…
पुढे काही लिहिण्या आधी…बाळा साहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होवो हीच प्रार्थना…
Bala Saheb Thakare – बाळा साहेब ठाकरे
बाळा साहेब ठाकरे यांची ओळख करून देण्या एवढा मी काही मोठा नाही…कदाचित आज त्यांच्यावर काहीलिहिण्या एवढा पण मी मोठा नाही…
पण आज मी लिहितोय याचे कारण आहे…तुम्ही…
अफवा पसरवणारे,,.. आणि अफवांवर विश्वास ठेवणारे तुम्ही….
एक सद्गृहस्त संध्याकाळी भेटले होते… बोलतात..
“काय मग उद्या सुट्टी ना ….साहेब तर दोन दिवसां पूर्वीच गेले….उद्या जाहीर करतील..”
ऐकून खूप राग आला..पण काय करणार…आपली संस्कृती… मोठ्यांचा मान राखावा म्हणून…नाहीतर….
पण हि अफवा एवढी पसरली कि …हे लोक..विसरले…कि हे कोणा विषयी बोलतात…
त्यात हे कोणी परके नाही…तर आपलेच…
सकाळी तर एक मेसेज आला..
” BAD NEWS, BALA SAHEB THAKARE EXPIRED.. ” माझ्याच एका मित्राचे प्रताप…
त्याला फक्त एकच रिप्लाय केला..
“तुझे वडील गेल्यावर पण असेच मेसेज सगळ्यांना करणार का?”
कशी लोक असतात…तो योद्धा आमच्या साठी ६० वर्षे लढला…आम्हाला नोकर्या मिळाव्यात म्हणून लढला..
आज आम्ही एका सुट्टीची अपेक्षा करतोय…
जिवंतपणी त्यांच्या मरणाच्या अफवा पसरवतोय…
अरे काही तरी लाज बाळगा…
आणि एक लक्षात ठेवा….इथे कोणीही अमर नाही…प्रत्येक जण हा जाणारच आहे…
पण महत्वाचे आहे ते काय ठेवून जाणार….
बाळा साहेब ठाकरे हे कधीच मारू शकत नाहीत…कारण त्यांचे विचार आमच्या मनात सदैव जिवंत राहणार …
आणि अफवा पसरवनार्यानो … जरा तरी मराठी असल्याची लाज बाळगा…
तुम्हाला उत्तर देतील ते साहेबच… जेव्हा मातोश्रीमधून बाहेर येतील आणि हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन करतील…
जय शिवाजी…जय भवानी…
मी मराठी… या दोन शब्दात माझी ओळख आहे.. मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे. माझी मैत्री अशा लोकांसठी आहे ज्यांना मराठी असल्याचा अभिमान आहे, ज्यांना मराठी बोलायला आवडतं आणि मराठी येत असून बोलण्याची ज्यांना लाज वाटते अशांचा मला राग येतो.
माझ्या मित्रांनो एक विनंती आहे.. इथे फक्त मराठीचाच वापर करावा. मराठी शब्द अथवा मराठी कवीता, मराठी म्हणी, वाक्प्रचार या विषयांवर चर्चा करावी.
धन्यवाद……………………जय महाराष्ट्र
jay maharastra….!