Marathi Movie Miss You Mister – मिस यु मिस्टर

1
8291

सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांचा मिस यु मिस्टर २१ जून ला प्रदर्शित होणार.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे मिस यु मिस्टर या आगामी चित्रपटा मध्ये. या चित्रपटामध्ये हे दोघे मुख्य भूमिका साकारणार आहेत.

मिस यु मिस्टर हा एक नवरा बायकोच्या नाते संबंधावर आधारित कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट आहे. ही गोष्ट आहे कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहणार्‍या वरुण आणि कावेरी यांची जे सुट्टीच्या दिवशी भेटतात. पण या मुळे त्यांच्या नात्यामध्ये काय बदल होतात आणि त्यातून निर्माण होणार्‍या परिस्थितीला दोघे कसे सामोरे जातात हे जाणून घेण्यासाठी २१ जून पर्यन्त प्रतीक्षा करावी लागेल.

चित्रपटात कावेरीची भूमिका मृण्मयी देशपांडे हिने तर वरुण ची भूमिका सिद्धार्थ चांदेकर ने केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. बस स्टॉप, मामाच्या गावाला जाऊया, मंगलाष्टक वन्स मोअर असे गाजलेले मराठी चित्रपट जोशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ‘बे दुणे दहा’, ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘एक नंबर’ या स्टार प्रवाहवरील टेलिव्हिजन मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

मृण्मयी आणि सिद्धार्थसोबत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर हे कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत. ‘मिस यू मिस्टर’ २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

Marathi Movie Miss You Mister Poster

Tag: Marathi Movie, Marathi Movie Miss You Mister, Marathi Movie Miss you mister poster, Mrunmayi Deshpande, Siddharth Chandekar, Marathi Movie 2019, Miss you Mister cast, Miss you mister release date, Latest Marathi Movie, Samir Joshi.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here