Marathi Movie Kokanastha Review – कोकणस्थ चित्रपट परीक्षण

0
1631

Marathi Movie Kokanastha Review – कोकणस्थ चित्रपट परीक्षणmarathi movie koknastha review

 

कोकणस्थ – ताठ कणा हाच बाणा,

निर्मिती    : ग्रेट मराठा एंटरटेंमेंट , स्टार प्रवाह.
दिग्दर्शक  : महेश मांजरेकर
कथा         : महेश मांजरेकर
कलाकार   : सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, उपेंद्र लिमये , जितेंद्र जोशी,मेधा मांजरेकर, वैभव मांगले ,सविता मालपेकर ,रोहण तळवलकर, वैदेही परशुरामी, मानसी नाईक
संगीत      : अक्षय हरीहरन
गाणी        : संदीप खरे
प्रदर्शनाची तारीख : १० मे २०१३

एका वाक्यात सांगायचे तर …

महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेला कोकणस्थ चित्रपट हा त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या विरूद्ध या हिन्दी चित्रपटाचा मराठी रिमेक  …

जर आपण अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, जॉन अब्राहम यांचा विरुद्ध चित्रपट बघितला असेल तर आपण कोकणस्थ नाही बघितला तरी चालेल.

पण जर आपण हा चित्रपट नसेल बघितला तर कोकणस्थ नक्कीच पाहू शकता.

कोकणस्थ ही गोष्ट आहे रामचंद्र गोविंद गोखले या निवृत्त मध्यमवर्गीय कोकणस्थ माणसाची. एवढाच काय तो चित्रपटाच्या नावाचा आणि चित्रपटाचा संबंध.

चित्रपटाची कथा संपूर्ण पणे विरुद्ध या हिन्दी चित्रपटासारखीच आहे,

रामचंद्र गोविंद गोखले आणि त्यांची पत्नी दोघे आपले निवृत्त आयुष्य आनंदात जगत असतात. त्यांचा एकुलता एक मुलगा स्वीझर्लंड मध्ये शिक्षण घेत असतो.  असे हे छोटे कुटुंब सुखी कुटुंब . मुलगा रोनु घरी येतो पण लग्न करूनच… आणि गोखले आणि त्यांच्या पत्नी दोघेही कोणतेही आढे वेढे न घेता त्यांनासमजून घेतात.

पण लगेजच, कुटुंबावर मोठे संकट येते, आणि कुटुंबावर होणार्‍या अन्याया विरुद्ध गोखले लढण्यास तयार होतात आणि तो लढा जिंकतातही.

चित्रपट तसा चांगलाच आहे, तरी फसलेल्या काही गोष्टी.

१. चित्रपटातील पहिलेच आणि कंटाळवाणे गाणे .

२. चित्रपटामधील अॅक्शन दृश्यांमधे चुकीच्या डमींचा वापर .

३. वकील (विजय कदम) यांना गोखलेंच्या शेजारील तरुण (उपेंद्र लिमये) यांनी केलेल्या मारहाणी नंतर, पुढच्याच दृश्यामद्धे वकील कोणत्याही बॅंडेज शिवाय दिसतात.

४. चित्रपटाचा वेग खूप संथ वाटतो.

[tube]3K1BhV9t_7A[/tube]

तरीही चित्रपट पाहण्या सारखाच.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here