“फर्जंद” च्या अभूतपूर्व यशा नंतर दिग्पाल लांजेकर घेऊन येत आहेत “फत्तेशिकस्त

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित “फर्जंद” चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक काळ फक्त ऐतिहासिक चित्रपटांचा होता पण गेली कित्तेक वर्षे या प्रकारातील एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. पण दिग्पाल लांजेकर ने फर्जंद चित्रपटाने ऐतिहासिक चिटपटांचा काळ पुन्हा जीवंत केला.
फर्जंद ही गोष्ट होती आदिल शहाच्या तावडीत असलेला पन्हाळा किल्ला कोंडाजी फर्जंद काही मोजक्या मावळ्यांना घेऊन कसा जिंकतो त्याची. या चित्रपटाने यशाची एक ऊंची गाठली, अनेक पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित करण्यात आले.
दिग्पाल ने आता “फत्तेशिकस्त” या त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्पाल ने चित्रपटाचे पोस्टर १ मे ला शेअर केले . चित्रपटच्या पोस्टर वरुन याही चित्रपटा मध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेमध्ये चिन्मय मांडलेकर असणार आहेत हे समजते.

मांडलेकरांबरोबरच याही चित्रपटामध्ये फर्जंद चित्रपटातील अंकित मोहन, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, अजय पूरकर, निखिल राऊत हे कलाकार सुद्धा असतील.
दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित आणि आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत
भारतातील पहिली “सर्जिकल स्ट्राईक” पहाण्यासाठी तयार रहा.
Fatteshikast Movie Posters


Tag: Fatteshikast, Marathi Movie, Director Digpal Lanjekar, Ankit Mohan, Mrunmayi Deshpande, Marathi cinema, Farzand, Marathi Movie Farzand, Marathi Movie Fatteshikast, Fatteshikast Movie Song, Fatteshikast movie cast, Free Download Marathi Movie Fatteshikast.
Auto Amazon Links: No products found. Blocked by captcha.









Download link kute aahe
Shvaji