
-तुषार दौलत भांड
Marathi Kavita Shetakari
” शेतकरी “
आभाळाची माया तुटली
पोशिंद्याच्या जीवावर उठली
ज्याला नाही संपत्ती ठेपली
त्याने कशाला आभाळाची दिशा पाहिली
ज्याच्याकडे नाही अठ्ठनी उरली
त्याची काया एका थेंबासाठी कळवळली
पाहता पाहता जमीन ही फाटली
शेतकऱ्याची समावून जाईल त्यात स्वप्नांची आहूती
हिरवी संप्पती त्याची कधी पाण्यावाचून वाळली
तर कधी पाण्यामुळे सडली
झाली देवाची कृपा तर संपत्ती मिळाली
नाहीतर संपत्ती लाखाची बुडवली
अशी शेतकऱ्याची भाषा ही जीवनाची
फक्त त्यालाच कळाली
लेखकाचे नाव:- तुषार दौलत भांड
कवितेचे नाव :- शेतकरी
Auto Amazon Links: No products found. Blocked by captcha.








