कवयित्री – भक्ती संतोष
संपर्क – bhaktisantosh99@gmail.com
प्रवास हा – Marathi Kavita Pravas Ha
रेल्वे चा हा प्रवास आज
वाटला खूप खास,
एकीकडून प्रवाश्यांची गर्दी
तर दुसरीकडून कचोऱ्यांचा सुवास।
लोकांचे भाव आणि त्यांचे स्वभाव
येतात या रेल्वेत अनुभवता,
त्यात एक व्यक्ती भेटते
जिचा स्वभाव असतो आपल्याशी मिळता जुळता।
गप्पांची मैफिल मग अशी काय रंगते,
स्टेशन आल्यावर मात्र गोष्ट अर्ध्यावरच संपते।
काही तर असतात इरसाल नमुने,
ज्यांचे नसते कोणाची घेणे देणे।
म्हणूनच रेल्वे चा हा प्रवास खास आहे,
आणि असा अनुभव सर्वांच्या आयुष्यातील
महत्वाचा भाग आहे।