सोनेरी पहाट – Marathi Kavita

0
830
Marathi Kavita – Soneri Pahat – सोनेरी पहाट

Marathi Kavita – Soneri Pahat – सोनेरी पहाट

कवयित्री – अलका राहुल डोंगरे

सूर्य उगवता होते
सोनेरी किरणाची पहाट
पहाट होताच कानी पडतो
पक्ष्यांचा चिवचिवाट
पहाट होताच कोंबड्यांची बाक
कानी पडते .

मंदिराच्या गाभार्‍यातील देवासमोर
दीपप्रज्वलित होतो .
पहाटेच अंगणात रचली
जाते सुंदरशी रांगोळी
रांगोळीतील सुंदरता बघून
नयन दीपून जाती.

अंगणातील तुळशी वृंदावनाला
वंदन करूनी प्रारंभ करू
आपण सगळे शुभदिनाची.
~ अलका राहुल डोंगरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here