Marathi Kavita – Tamasha – तमाशा
कवि – मयूर गुरव
तमाशा माझे जीवन
छुम छुम घुंगरु बांधून पायी
ऊभी राहते मी फडावरी
घ्यावा माझा मुजरा मनाचा
तुम्ही रसिक मायबाप आमचा (1)
माळूनी सुगंधी गजरा केसात
नथ सोन्याची सजली नाकात
हिरवी नारंगी पैठणीं अंगावरी
चांदीचा पट्टा कमरेवारी (2)
काळीसावळी माझी काया
रसीक करिते माया
सडपातळ बांधा माझा असा
नृत्यात माझ्या अनेक अदा (3)
थुई थुई उडवीत पाय नाचते मी
कंबर लचकवत नयन मिचकवीत मी
देहभान विसरुन जाती नाचताना मी
वंदन करिते नटराजाला शरणं जाऊनी (4)
आज द्यावा आधार पुन्हा आम्हाला
होऊनी ऊभी पुन्हा तमाशाला
द्यावा जिव्हाळा आणि प्रेम आम्हाला
लोककला आमची सादर तुम्हाला (5)