निसर्गाचे धन्यवाद – Marathi Kavita

0
245
Marathi Kavita – Nisargache Dhanyavad – निसर्गाचे धन्यवाद

Marathi Kavita – Nisargache Dhanyavad – निसर्गाचे धन्यवाद

कवि – अमित सुतार, कोल्हापुर

अखंड समुद्र वाहती नद्या,
सुंदर तळे वाहतो झरा,
निसर्ग आपला मित्र खरा,
निसर्गाचे धन्यवाद करा.

रंगीत फुले चवदार फळे,
कडधान्य भाज्या शेतात पेरा,
निसर्ग आपला मित्र खरा,
निसर्गाचे धन्यवाद करा,

झाडे लावा झाडे जगवा
पर्यावरणाचे रक्षण करा
निसर्ग आपला मित्र खरा,
निसर्गाचे धन्यवाद करा,

गोड आंबट तिखट खारट,
न्याहरी जेवण मजा करा,
निसर्ग आपला मित्र खरा,
निसर्गाचे धन्यवाद करा,

किटक असो वा जीव सजीव,
पशुपक्ष्यांवर प्रेम करा,
निसर्ग आपला मित्र खरा,
निसर्गाचे धन्यवाद करा.

कागद कापड धातु निर्मिती,
खडक मातीचाही उपयोग करा,
निसर्ग आपला मित्र खरा,
निसर्गाचे धन्यवाद करा.

आसो बाल तरुण म्हातारपण,
डोंगरद-या मुक्त फिरा,
निसर्ग आपला मित्र खरा,
निसर्गाचे धन्यवाद करा.

उन्हाळा पावसाळा हिवाळा,
ऋतु बदलाचा खेळ सारा,
निसर्ग आपला मित्र खरा,
निसर्गाचे धन्यवाद करा.

जीवन आपले आनंदाने जगा,
एकदाच मिळते विचार करा,
निसर्ग आपला मित्र खरा,
निसर्गाचे धन्यवाद करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here