
Marathi Kavita – Chiu – चिऊ
कवि- अमित विक्रम पवार
मुसळधार होता चार दिवस
अर्धपोटी घालवले वासर कसे-बसे
आज एकदमच राहवेना
पिलं पण ओरडेनात निस्तेज भुकेलेसे
घटकाभर भटकल्यावर
जीव लागला टांगनीला
श्रीहरीचा धावा मनी
रन-रन, वन-वन जीव व्याकूळला
टाकते नजर चौफेर
बावरी कापरी भिरभिर
चिवचिवाट कराया
त्राण हा सरेना
पोळी नसली भाकरी नसली
चालेल अमावस्येचा दही भात
तगमग मरमर शोधते चिऊ
कुणी फेकलं आहे का खरकटं
माऊली होती अंगणात
लीला दाखवीत श्रीकृष्ण समवेत
वरण भात खाता खाता
चिऊ कडे राहिले बोट दाखवीत
बाळ करी घासाचा आग्रह
चिऊ विसावली क्षणभर
लक्ष वेधण्यास चिव चिव
धडपड बडबड बाळाची
माऊलीने दिला अमृताचा वाटा
जेवली चिऊ पोटभर
पिलासाठी घेऊनी चोचीत
घरट्या कडे निघाली फर फर
…..अवि पवार
Auto Amazon Links: No products found.








