प्रत्येक स्त्री – Marathi Kavita

28
1651
Marathi Kavita -Pratyek Stree

Marathi Kavita – Pratyek Stree – प्रत्येक स्त्री

कवयित्री – आर्या

बंदिस्त होत माझं मन, वर्षानुवर्ष अडकलेलं 

मोकळं होऊ पहातय आता ,साखळदंडात जखडलेल.  

स्वच्छंद आकाश खुणावतंय त्याला,पक्ष्याप्रमाणे निर्भय उडायला 

हळू हळू घेतय भरारी,नाही जमत एकदम स्वैर व्हायला 

विचार तर पिच्छा सोडत नाहीत, पण शिकतय ते दुर्लक्ष्य करायला 

झुगारून निर्बंध सारे,शिकायचंय आता अनिर्बंध बदलायला 

अचानक तर जमणार नाही, पण करायची आहे सुरवात जगायला 

स्वतःला स्वतःमध्ये शोधून, खरंच स्वतःच्या मनासारखं वागायला 

जगता आलच नाही कधी,स्वतःच्या मनाप्रमाणे मनासारखं 

नेहेमीच केला दुसऱ्याचा विचार ,कोणाला समजलं नाही परकं 

पण परकेच निघाले सगळे,कोणी नाही आपलं 

स्वतंत्र झाले सगळे, ज्यांना मनापासून जपलं 

म्हणून आता ठरवलेय,आपल्याला पाहिजे तेच करायचं 

जगण्याचं नाटक नाही तर  खरखुर  जगायचं . 

28 COMMENTS

  1. अतिशय समर्पक शब्दात आजच्या स्त्री चे वर्णन आर्या यांनी केले आहे.आर्या तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

  2. प्रत्येक काळातील स्त्रीची कथा ,योग्य शब्दात व्यक्त ,शुभेच्छा

  3. खूप सुंदर कविता .. असं अनिर्बंध जगता आलं पाहिजे

  4. खरच थोड्या फार फरकाने हीच आहे प्रत्येक स्त्री ची खरी खुरी वेदना

  5. ​स्त्री चे आयुष्य वर्षानुवर्षं एक ठराविक चाकोरीत अडकल्याची सत्यता खूप छान मांडली आहे

  6. खूप खूप सुंदर…. एका स्त्री ची खरी प्रतिकृती !!

  7. कविता वाचून प्रत्येक स्त्रीला ती तिच्याच संदर्भात आहे असे जाणवेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here