नातीगोती – Marathi Kavita

0
328
Marathi Kavita – NatiGoti

Marathi Kavita – NatiGoti – नातीगोती

कवयित्री – रसिका भावे

माणसाने नात नाही जपलं नात्यात
तर एक दिवस खरोखर संबंध येइल गोत्यात

एकमेकांच्या  सान्निध्यात रहायला माध्यमं आहेत बरीच
पण त्यासाठी मनातून इच्छा हवी खरोखरीच

नातं जर टिकवून ठेवायच असेल तर मनोमनी  मनीषा हवी जोरकस
आणि त्यासाठी आपलं मन हव सकस

नात निभावून न्यायच असेल तर हवा मनाचा मोठेपणा आणि समज
लहान पणापासून ह्याची सवय असली तर हे होईल अगदि सहज

नात्याची वीण घट्ट करायला हवा दुसऱ्याचा थोडा विचार
परस्परांशी नातं ठेवण्यासाठी पाळला पाहिजे शिष्टाचार

नात खुलवायच असेल तर दोन्ही कडून पाहीजे प्रयत्न
नाहीतर एक दिवस कोलमडून पडेल आणि परत येणं होईल अशक्य

जस पावसाच्या थेंबाने पानांवर मोती होऊन सजाव
त्याच प्रमाणे नात बहरून जाण्यासाठी जिव्हाळा आणि प्रेम यांनी मनात रूजाव

नात्यांची गुंफण मजबूत व्हायला हवा आपुलकीचा ध्यास
तरच संबंध घनिष्ट होऊन नवी पालवी फुटेल हमखास

नात कस हव…हव आकाशापेक्षा विशाल
म्हणजे सर्वांना देता येइल आपल्या नात्याची मिसाल

आपल्या सगळ्यांच नातं हव सागरापेक्षा ख़ोल
हे घडवून आणण्यासाठी लावलेला हातभार ठरेल अनमोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here