Marathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय

0
390
Marathi-Kavita-Mala-punha-lahan-banayachay

Marathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय

हे घड्याळ मागे फिरवा
तो सूर्य उलटा वळवा
मला पुन्हा लहान बनायच
माझ्या देवाला कुणी  कळवा

ती स्कूलबस परत बोलवा
ती घंटा परत वाजवा
मला पुन्हा शाळेत जायचंय
माझ्या टिचरना कुणी कळवा

त्या अमित मनीष ला शोधा
त्यांचा नंबर कुणी मिळवा
मला लंगडी क्रिकेट खेळायचंय
माझ्या दोस्ताना कुणी कळवा

हा स्वभाव माझा हळवा
तरी स्पष्टपणा येई आडवा
दुरावलेल्यांना सॉरी बोलायचय
त्या सर्वांना कुणी कळवा

काळाची चक्र फिरवा
स्वर्गाच दार कुणी उघडा
मला आजीला बिलगायचंय
माझ्या बाप्पाला कुणी कळवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here