Marathi Kavita – ती
ती प्रपात होती कोसळणारा
अन तो तिला ओंजळीत
पकडू पाहता होता
वादळ होती ती
अन तो तिला
मिठीत कैद करू
पाहत होता
कसे शक्य होते ते
काय करावे कळेना त्याला
तिच्या शिवाय कुणाला
कळणार पण नाही
ही हतबलता
मग तीच म्हणाली त्याला
अरे ओंजळ काय किंवा मिठी काय
अडकून पडायला होते रे
तो म्हणाला मग काय करू मी
तू मला हवी आहेस
ती म्हणाली, मनात जरा डोकावून बघ की
माझ्या साठी जागा आहे का, अन थोडा वेळ आहे का
मन जरा मोठे कर, अन मग हे वादळ
येईल तुझ्या कडेच शांत व्हायला
– शीतल