Marathi Kavita – माणुसकी

1
6640

Marathi Kavita – माणुसकी

marathi-kavita-manusaki

​माणसांतील माणूस जणू कशापरी हा भेदभाव
आत्ता तरी आपण माणुसकीने वागूया की हो राव ।।धृ।।

जाती धर्म अन पंथामध्ये विभागला हा समाज
परी गरज एकोप्याची समाजाला आहे की हो आज
ती तोडून सारी बंधने सर्वजण एक होवूया की राव
आत्ता तरी आपण माणुसकीने वागूया की हो राव ।।०१।।

कोणताही धर्मग्रंथ न शिकवे विषमतेचे धडे
परी धर्मा-धर्मांत का पडतात विषमतेचे खडे ?
ते वेचूनी सारे खडे एकोपा पसरवूया की राव
आत्ता तरी आपण माणुसकीने वागूया की हो राव ।।०२।।

एकसमान न्याय-व्यवस्था येथे निसर्ग चालवितो
परी अस्पृश्यतेचा विटाळ येथे आपण का माजवितो ?
मुठ-माती सर्व विटाळानां आपण देवूया की राव
आत्ता तरी आपण माणुसकीने वागूया की हो राव ।।०३।।

गरीब-श्रीमंत भेदभाव हा जिथे-तिथे हो चाले
आर्थिक विषमतेची दरी येथे दिवसेंदिवस वाढे
आर्थिक समानता आणण्याचा प्रयत्न करुया की राव
आत्ता तरी आपण माणुसकीने वागूया की हो राव ।।०४।।

– मिलिंद डोंबाळे (देशमुख) ​​​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here