Marathi Book Khekda – खेकडा मराठी पुस्तक

1
2018

Marathi Book Khekda – खेकडा मराठी पुस्तक

Marathi-book-khekda

खेकडा या कथा संग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे. ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे. या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ति आहे. या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो. कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत.

जसे ‘तुमची गोष्ट’ आरंभीच लेखक सांगतो, ही ‘तुमची गोष्ट आहे म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी’ आणि शेवटीही निक्षून सांगतो, ‘तुमची म्हणून सांगीतलेली  ही गोष्ट तुमची नव्हेच, एक आपली शक्यता सांगितली एवढेच ‘, पण तरीही या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन आहे. त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श तुमच्या मनीमानसी नसूनही तुमच्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना तुम्ही अनुभवता.

रत्नाकर मतकरी हे एक सिद्धहस्त कथाकार आहेत आणि या कथा संग्रहातील कथा मराठी भाषेत तरी दुर्मिळ अश्या आहेत. या कथांचे अन्य भाषेत अनुवाद  झाले तरते फक्त मतकरींचे प्राप्त यश वृद्धिंगत करतील असे नव्हे, तर परिणामी मराठी भाषेलाही ललामभूत ठरतील

Buy Marathi Book Khekda by Ratnakar Matkari from MarathiBoli.com at low price, with 15% discount. Marathiboli.com is only one online marathi book store on internet which works on NO profit No Loss.

Buy any book from Marathiboli.com at 15% discount.

To buy marathibook Khekda by ratnakar matkari, click below.

http://marathiboli.com/khekda

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here