Marathi Blogs – मराठी मधून ब्लॉग बनवायचाय?

2
2197

Marathi Blogs – मराठी मधून ब्लॉग बनवायचाय?

हा लेख फक्त त्यांच्यासाठी आहे, ज्यांना मराठीतून आपले विचार इंटरनेट च्या मायाजाळात मांडायचे आहेत, आज इंटरनेट वर अनेक मराठी ब्लॉग्स आहेत.

सर्वप्रथम ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग म्हणजे संकेतस्थळाच्या माध्यमातून आपले लेख वाचकांपुढे मांडणे.

Marathi-Blogs

मराठीबोलीच्या अनेक वाचकांनी मला अनेकदा विचारले, ब्लॉग कसा बनवायचा? त्यातून उत्पन्न कसे मिळवायचे?

तसे ब्लॉग मधून उत्पन्न मिळवणे सोपे नाही.. पण कठिणही नाही.

पण अनेकांकडे ब्लॉग बनवण्याचे तांत्रिक कौशल्य नसल्याने, त्यांना आपले लेख इंटरनेटच्या मायाजाळात मांडता येत नाहीत.   अश्याच मराठी ब्लोगेर्ससाठी ही लेखमाला?

या लेख मालेतील पुढील लेखांमद्धे आपण आपला ब्लॉग कसा बनवायचा याची तांत्रिक माहिती देण्यात येईल, तसेच आपला ब्लॉग सर्वाधिक मराठी वाचकांपर्यंत कसा पोहचवायचा, सर्च इंजिन ओप्टिमायझेशन, डोमेन नेम, वेब होस्टिंग अशी सर्व माहिती देण्यात येईल.

तरी देखील अनेकांना हे काम किचकट वाटते,  याच एका कारणा मुळे मराठीत खूप कमी ब्लॉग्स आहेत.

म्हणून अश्या ब्लोगेर्सना सर्व तांत्रिक मदत मराठीबोली.इन आणि मराठीब्लोग्स.इन पुरवतील.

या सुविधे मध्ये आपणास मिळेल आपले स्वताचे डोमेन नेम (उदा. मराठीबोली.इन)

ज्याची अंदाजे किम्मत बिगरॉक.इन प्रमाणे (.net 299, .com Rs.599,  .in Rs.229)

वेब होस्टिंग बिगरॉक प्रमाणे (रु. १५९ एका महिन्यासाठी) म्हणजेच वर्षाला १९०० रुपये.

वर्डप्रेस सेटअप (स्वता केला तर मोफत) आणि प्रॉफेशनल मदत (अंदाजे रुपये २०००)

वर्डप्रेस थीम (इंटरनेट वरील मोफत थीम) किंवा प्रीमियम थीम (अंदाजे १००० ते ३०००)

या सर्व तांत्रिक गोष्टी आम्ही पूर्ण करून देऊ, त्याही फक्त ११०० रुपयांमद्धे (एका वर्षासाठी, कारण डोमेन नेम आणि वेब होस्टिंग याचे चार्गेस वार्षिक असतात).

यात आपणास मिळेल,

१. आपल्या आवडीचे डोमेन नेम (.कॉम. .इन .नेट ….)

२. वेब होस्टिंग (५०० एमबी, ५ मेल अकाऊंट)

३. वर्डप्रेस सेटअप

४. तुम्हाला पसंद पडेल अशी मोफत थीम

५. सर्च इंजिन ओप्टिमायझेशन

६. मराठीब्लोगर्स.इन या संकेत स्थळावर जाहिरात.

आपल्याला फक्त लेख लिहायचे आहेत,

ही सुविधा कोणत्याही नफ्या शिवाय फक्त मराठी ब्लॉग्स साठी आहे. अधिक महितीसाठी social@marathiboli.in यावर मेल करावा.

कोणत्याही मराठी ब्लोगर्सला ज्याने डोमेन नेम आणि वेब होस्टिंग विकत घेतले आहे, अश्या मराठी ब्लोगर्सना काही अडचण असल्यास देखील मेल करा.

मोफत मदत केली जाईल… मराठीतून अधिकाधिक ब्लॉग्स बनावेत याच साठी.

आपल्या मराठीब्लोग्स ची नोंदणी मराठीब्लोग्स.इन वर करा आणि वाचक वाढवा?

मराठी पुस्तके सवलतीमद्धे घरपोच मिळवण्यासाठी भेट द्या मराठीबोली.कॉम

2 COMMENTS

  1. Nice & detail information. Thanks a lot for guidance.I want to know more about blogging.

    please help where should I have to contact

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here