Dr. Prakash Baba Amte Movie review – डॉ. प्रकाश बाबा आमटे

0
1730

Dr. Prakash Baba Amte Movie review – डॉ. प्रकाश बाबा आमटे

prakash-baba-amte-marathi-movie

  • निर्मिती  : अॅड समृद्धी पोरे
  • दिग्दर्शन : अॅड समृद्धी पोरे
  • कलाकार  : नाना पाटेकर ( Nana Patekar ), सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) , मोहन आघाशे ( Mohan Aagashye ), विक्रम गायकवाड, आशीष चौगुले ,तेजश्री प्रधान ( Tejashri Pradhan )
  • लेखक : अॅड समृद्धी पोरे
  • पटकथा/संवाद : अॅड समृद्धी पोरे
  • गीत : गुरु ठाकुर ( Guru Thakur )
  • संगीत  : राहुल रानडे
  • प्रदर्शन : १० ऑक्टोबर २०१४

“डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रीयल हीरो” हा मराठी चित्रपट डॉ. प्रकाश आमटे यांचे चरित्र चित्रणच म्हणावे लागेल, हेमलकसातील आदिवासिना मुख्य प्रवाहात आणणे हे बाबा आमटे यांचे स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य वाहणारे डॉ. प्रकाश बाबा आमटे.. द रीयल हीरो..

हेमलकसा, गडचिरोली जिल्ह्यातील एक डोंगराळ भाग, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर असलेले प्रकाश आमटे आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी मंदाकिनी आमटे या शहरातील आपले सुखी जीवन सोडून आपल्या सहकार्याँ समवेत हेमलकसामध्ये येतात त्यांची ही कथा..

१९७३ साली जेव्हा हेमलकसा मध्ये लोकबीरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा येथील आदिवासी हे भूक, रोगराई आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला होता.  त्यात भर म्हणून पोलिसांचा त्यांच्यावर होणारा अत्याचार . परिस्थितीमुळे नक्षलवादाकडे वळलेले आदिवासी… अश्या हेमलकसामध्ये प्रकाश बाबा आमटे आपली पत्नी आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात करतात. पकल्प सुरू करताना आणि तो पुढे चालवताना त्यांना अनेक अडचणी येतात .. ज्या हेमलकसातील आदिवासिना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आमटे करत असतात सुरुवातील त्यांची भाषाच त्यांना कळत नसते… अश्या अनेक अडचणींवर मात करत… डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आपल्या इच्छा शक्तीच्या  आणि जिद्धीच्या जोरावर हेमलकसामध्ये ज्ञानाचे नंदनवन फुलवले.

मला आई व्हायचय या चित्रपटासाठी राष्ट्रीय परितोषिक मिळालेल्या अॅड. समृद्धी पोरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटची कथा ही या चित्रपटाचा मूळ गाभा असली तरीही नाना पाटेकर ( Nana Patekar ) यांनी डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि सोनाली कुलकर्णी ( Sonali kulkarni ) यांनी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. चित्रपटात डॉ. मोहन आगाशे यांनी बाबा आमटेंची भूमिका साकारली आहे.

चित्रपट हा उत्तम बनतो तो त्याच्या कथेमुळे आणि डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्य मुळे. चित्रपटात नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी आणि इतर कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. चित्रपट फसतो तो त्याच्या कथेच्या मांडणी मध्ये, अनेक प्रसंग रसिकांसमोर एकामागून एक येतात पण अनेकदा त्यांना जोडणारा धागाच नाही. स्ंनवद लेखन अजून चांगले आणि परिणाम कारक करता आले असते. चित्रपट दिग्दर्शनात थोडा मागे जारी पडला असला तरी.. उत्तम अभिनय, उत्तम कथा आणि प्रकाश बाबा आमटे यांचे कार्य यांनी रसिकांची माने जिंकतो.

प्रत्येकाने एकदा पहायलाच हवा असा चित्रपट…. डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रीयल हीरो .. जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा..

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचे प्रकाशवाटा हे पुस्तक सवलतीमध्ये विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here