कालच सुशीलकुमार शिंदे यांचे वक्तव्य ऐकले…”जशी जनता बोफोर्स विसरली तशीच एक दिवस कोळसा पण विसरून जाईल.”
यानंतर..त्यांनी हे गमतीने म्हटले असे सांगितले…
पण या वक्यातील सत्यता त्याने कमी होत नाही….अजाणते पणी का होईना..सुशीलकुमार शिंदे यांनी सत्यपरिस्थिती सांगितली आहे…
काय करणार आपण…नेत्यांनी भ्रष्टाचार करायचा…त्यावर मेडियाने तो उघडकीस आणून टीआरपी कमवायचा..विरोधी पक्षांनी आवाज उठवायचा आंदोलने करायची आणि आपल हिस्सा मिळवायचा..
आणि आपण देखील ८-१० दिवस खूपच मोठा भ्रष्टाचार असेल तर एखादे वर्ष लक्षात ठेवायचा आणि नंतर विसरून जायचा..
आपण पण साधाच विचार करतो १.८६ लाख करोड चा भ्रष्टाचार झाला…पण माझे कुठे काय गेले…माझा पगार तर मला मिळाला…मग सोडून द्या..
असाच विचार आपण करतो आणि विसरून जातो…
पण मित्रानो हे १.८६ लाख करोड रुपये आपलेच होते…प्रत्येत कर दात्याचे होते..
मग अजून मोठे घोटाळे होतात…
कालच स्वयंपाकाच्या ग्यास व डीजेल च्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या..याचे कारण हेच घोटाळे आहेत..यांनी.मोठे घोटाळे करायचे आम्ही ते विसरायचे आणि किमती वाढल्या की सरकारला शिव्या द्यायच्या…आणि आंदोलने करायची..
याला आपणही तेवढेच जबाबदार आहोत..कारण भ्रष्टाचाराची सुरुवात आपल्या पासूनच होते..आपणही भ्रष्टाचार करतोच की…कधी ट्राफिक हवलदाराला आपणच शंभर ची नोट देतो…तर कधी टिकेट तपासणाऱ्या टिसी ला … आपले पैसे वाचवण्यासाठी..
आपणही तेवढेच भ्रष्टाचारी आहोत..फरक फक्त एवढाच आहे
आपला भ्रष्टाचार हा शेकड्या मध्ये…नगर सेवकांचा हजारांमध्ये , राज्य सरकार मधील नेत्यांचा लाखांमध्ये, केंद्र सरकार मधील नेत्यांचा करोडोंमध्ये..वरपासून सगळेच भ्रष्टाचारी..
त्यात गेल्या ६५ वर्षांमध्ये किती मंत्र्यांना कायद्याने शिक्षा केली आहे..? हा प्रश्न आहेच..
त्यामुळे..यांनी घोटाळे करायचे…आम्ही ते विसरायचे..
आता आपल्या कलमाडी साहेबांचेच बघाना … पुन्हा साहेब पुण्याच्या राजकारणात सक्रीय झाले….पुन्हा निवडणूक जिंकून पण येतील…
राजा साहेब सुद्धा सध्या जामिनावर बाहेर आले आहेत…परत कधी आत जातील हे कोणीच सांगू शकत नाही..
ज्यादेशात कसाब सारख्या गुन्हेगाराला शिक्षा होत नाही..तिथे या नेत्यांना कोण शिक्षा देणार..
पण हे आपणच बदलू शकतो…आपल्या एकीमध्ये ही ताकद आहे…की आपण भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करू शकतो..
आपला देश काही गरीब देश नाही आहे…हा गरीब जनतेचा आणि श्रीमंत नेत्यांचा असा श्रीमंत देश आहे..
अरे आपल्या देशात झालेल्या घोटाळ्यांची एकत्रित रक्कम बघीतली..तर ती जगातील कित्येक देशांच्या ५ वर्षाच्या बजेट पेक्षा देखील अधिक आहे..
आपले नेते पण खूप शहाणे…आता तर स्वताचा मतदारसंघ स्वताच तयार करतात..आपल्या मतदार संघात परप्रांतीयांना बोलावून त्यांना रेशन कार्ड मिळवून देवून..त्यांना रहिवासी दाखला पण देतात…यांनी बनवलेल्या अनधिकृत बांधकामांना सौरक्षण देतात..आणि सामान्य माणूस रोज आपल्या घरापासून २ ते ३ तास प्रवास करून आपल्या कार्यालयात पोहचतो..आणि वर्तमान पत्रात बातमी वाचतो..२००० पर्यंतच्या झोपड्या सरकारने नियमित केल्या असून..सर्वाना पक्की घरे बांधून दिली जातील..
मग त्याच्या मनात विचार येतोच..माझ्या पगारातील कर कापला जातो..पण मला महानगरात घर नाही..मग मी का भरू कर..?
असो…आज मात्र मी एक प्रतीज्ञा करतो..
भारत माझा देश आहे..
या देश साठी मी काहीही करू शकतो..
मी आज पासून कधीच कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही..किंवा माझ्या डोळ्यासमोर कोणालाही करू देणार नाही..
रस्त्यावर पडलेल्या खड्यानपद्धाल फक्त सरकारला शिव्या देणार नाही..तर त्या भागातील नगर सेवकाला त्याचा जाब विचारीन..