कवी – खंडोबा आडसूळ
संपर्क – khanduadsul1994@gmail.com
मावळा – Marathi Kavita Mavala
अभिमानचं वाटतो महाराज आज ही आपले मावळे
आपली पालखी आनंदानं मिरवतात दुःख एवढचं की,
तुमच्या शौर्याच्या पोवाडया ऐवजी
बदनाम मुन्नी किंवा शिला की जवानी वाजवतात
महाराज तुम्ही चं शिकवण दिली स्वराजाची आम्हाला ,
नाहीतर मी स्वराज्यासाठीलढण्या ऐवजी
फक्त पोटासाठी शेंडागोंडा खुडला असता ,माझाचं वंश आज गुलामीत बुडाला असता.
लढलो महाराज मी जोमान लढलो गड ही जिंकले.दुःख एवढचं महाराज आज
स्वराजाचा अपभ्रंश राजकारण झाला आनं तोफ गोळा झेलणारे मावळे आम्ही
अश्वासणाच्या भाषणाचा मारा आज असह्य झाला
कदाचित त्याच अपभ्रंशाचा गळफास ही झाला.
पण महाराज मीचं तो राजकारणाचा तुरा डोक्यावर मिरवणारा
आणि स्वराज्य नायक विश्ववंदीता श्री श्री राजे शिव छत्रपती चीपालखी मोकळीच मिरवणारा
तरी राजे लोटला कधी तुम्ही स्वराजाला गणिमी काव्यानं कळवतो तुम्हाला
घेऊन चला राजे तुमच्या चं हया गनिमी मावळ्यांना
तुमच्या त्या सह्याद्री च्या पाठीवर बसून गरजणार्या स्वराज्याला
तुमच्याच तालमितला मावळा राजे पण काळ लोटलेला
नाहितर काढल्या असत्या तलवारी
भात्यात शांततेने लाल झालेल्या,पाजल असत गनिमाच रक्त,
स्वराज्य उभाराया……………….स्वराज्य उभाराया ………..!