- निर्माता: अलका कुबल आठल्ये, शिल्पा मसुरकर
- दिग्दर्शक: रमेश मोरे
- कलाकार: मिलिंद गवळी, प्रमोद कंडाळकर
- प्रदर्शन दिनांक: १ जून २०१२
हा चित्रपट प्रसिद्ध तृतीयपंथी समाज कार्यकर्ती लक्षमी त्रिपाठी वर आधारीत आहे. ही कथा आहे चार तृतीयपंथांची आणि या चित्रपटाच्या निर्देशिका आहेत अलका कुबल आठल्ये आणि दिग्दर्शक आहेत रमेश मोरे ज्यांना ‘चॅम्पीयन’ या चित्रपटासाठी मागच्या वर्षी सन्मानित करण्यात आले. मिलिंद गवळी यांनी ‘हे मिलन सौभाग्याचे’, ‘देवकी’, ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘मराठा बटालियन’ या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत आणि या चित्रपटात त्यांनी हिंदी चित्रपटसृत्ष्टीतील प्रसिद्ध तृतीयपंथी लक्षमी त्रिपाठीची भूमिका केली आहे. मिलिंद गवळी हे अनू नावाच्या मुख्य भूमिकेत दिसतील.
‘आम्ही का नाही’ ह्या परु नाईक लिखित पुस्तकावरुन प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनविला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी हा चित्रपट इंग्रजी उपशीर्षकांमध्ये प्रदर्शित होणार आहे.