Marathi Book Aalekh – आलेख – रणजीत देसाई
रणजित देसाईयांच्या बहारदार कथा.
‘आलेख’ हा रणजीत देसाईंचा ग्रामीण जीवनावरील आधारित कथांचा संग्रह. गाव वरवर जरी शांत वाटत असले तरी अंतरंगात कितीतरी घडामोडी चाललेल्या असतात. गावची चावडी, गरीबाची झोपडी, डोंगरमाथे, करवंदांच्या जाळ्या हि घटनांची केंद्रस्थलं. गावतली तार्ह्येवाईक, इरसाल, बेरकी, गरिबीने गंजलेली, देवभोळी, अंध्श्राधाळू माणसं! निसर्ग आणि जनावरं यांच्यशिवाय त्यांच्या जीवनाला पूर्णत्व येतच नाही. हि माणसं त्यांच्या ईर्षा, त्यांचा बाणेदारपणा, यातना, मुलांवरील माया, शहरवासियांशी त्यांचे येणारे संबंध, सर्व सच्चेपणाने जगतात, निभावतात. निसर्गानी जनावरांशी एकरूप झालेली हि माणसं त्यांच्या रंगरेशांसह देसाई यांनी आपल्या लेखणीतून तितक्याच सच्चेपणाने चितारलेली आहेत.
आलेख पुस्तक सवलतीच्या दरात घरपोच मिळवण्यासाठी क्लिक करा.
रणजीत देसाई यांची इतर पुस्तके मिळवण्यासाठी इथे क्लिक करा .