Shashank Ketkar Biography
झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी या घरची, या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतून घराघरामध्ये लोकप्रिय झालेला अभिनेता शशांक केतकर. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची बस स्टॉप वरची प्रेमकहाणी खूपच लोकप्रिय झाली.
जाणून घेऊया शशांक पदधल थोडेसे..थोडक्यात..
नाव – शशांक शिरीष केतकर
जन्म – १५ सप्टेंबर १९८५
महाविद्यालय – डी. वाय . पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुरडी, पुणे
शहर – पुणे.
सध्या होणार सून मी या घराची या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेल्या शशांक केतकर ने आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती पूर्णविराम या नाटकातून. शशांक ने कालाय तस्मै नमः या इ टीव्ही वरील मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले, या नंतर फिरून नवी जन्मेन मी, रंग माझा वेगळा, सुवासिनी, स्वप्नांच्या पलीकडले अश्या अनेक मालिका केल्या.
पण शशांकला खर्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली ती तेजश्री प्रधान बरोबर केलेल्या होणार सून मी या घराची या मालिकेतून.