Satyamev Jayate – सत्यमेव जयते

3
6288

Satyamev Jayate – सत्यमेव जयते…

satyamev jayate
satyamev jayatesatya

दोन शब्द…ज्यावर भारताची न्यायव्यवस्था आधारित आहे असे हे दोन शब्द…

पण काय खरच सत्यमेव जयते…

उद्या २००७ साली झालेल्या एका हत्येचा निकाल आहे…त्यामुळे आज गुन्हेगाराला फाशी होणार की जन्मठेप आज याचीच चर्चा आहे…

असो..याचे काय होईल ते उद्या कळेलच..

पण काय, न्याय व्हायला खरच एवढ्या वर्षांचा कालावधी आवश्यक आहे..?

उद्याच्या निकालानंतर आरोपी पुन्हा वरच्या कोर्टात अपील करतील मग अजून ५ वर्ष…मग अजून एक कोर्ट..
काय हे असेच चालणार…

४ वर्षान पूर्वी ज्याने सर्वांच्या समोर आमच्या २०० मुंबईकरांना अमानुष पणे मारले..आम्ही आज ४ वर्ष झाली तरी त्याचा गुन्हा सिद्ध करतोय..

आणि तो मात्र मस्त पैकी बिर्याणी खातोय..

तिकडे मराठवाड्यात आमचे शेतकरी खायला काही नाही म्हणून आत्महत्या करत आहेत…अरे या सरकारला थोडी जरी जाण असेल तर त्या शेतकर्यांना साधे वरण भात तरी द्या…

पण ते काही आमचे सरकार नाही करणार…जाऊदे..आज विषय वेगळा आहे..या विषयावर पुन्हा कधी तरी बोलीन..

भारतात खरोखर न्यायव्यवस्था आहे..की तो पण एक बाजार आहे..सांगणे जरा कठीण आहे.. निवडणुकीनंतर आमदार खासदार तर अगदी नगरसेवक पण विकले जातात…मग गरीब बिचारा साक्षीदार विकला गेला तर त्यात काय नवीन..

कधी पैशासाठी तर कधी जीवासाठी..पण साक्षीदार इथे नेहमीच विकला जातो..मग न्याय कसा होणार..

आणि एखादा साक्षीदार टिकलाच तर त्याला कोर्टात आरोपीचे वकील सांभाळून घेतात..

कित्येक केसेस तर अश्या असतील ज्यातील आरोपी आणि साक्षीदार दोघेही ..वयोमानाने मरण पावले असतील…

मान्य सत्यमेव जयते…..पण ते जर एवढ्या उशिराने जिंकत असेल तर ती सत्याची हारच आहे ना ?…

कदाचित अजून ४-५ वर्षांनी कसाबला फाशी होईल…पण ती फाशी बघायला ते लोक उपस्थितीत असतील का ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री या हल्यात मरण पावली..

मग तेव्हा त्या कसाबला फाशी देवून काय उपयोग…
न्याय हा वेळेवर झाला तरच तो न्याय…नाहीतर तो अन्यायाच असतो..
भारतात मागील वर्षी २जी घोटाळा झाला..त्यानंतर कॉमनवेल्थ घोटाळा झाला..सध्या दोन्ही आरोपी जामिनावर सुटले आहेत…जिथे कसाब सारख्याला शिक्षा व्हायला एवढी वर्ष लागतात..तर अशा राजकारण्यांना तर शिक्षा होऊच शकत नाही…तशी अजून कधी झालेली पण नाही..

मग पुन्हा हे अजून नवीन गुन्हे करायला मोकळे…

जेव्हा प्रत्येक गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा वेळेतच मिळेल तेव्हाच…
म्हणता येईल..
सत्यमेव जयते….

3 COMMENTS

  1. he asach chalu rahanar aahe. jo paryant aapan apalya adhikaracha yogya vapar karat nahi to paryant chukiche lokpratinidhi sadanat basnar aani chukiche vaganar. yala aapanch jababdar nahi aahot ka?

    • नक्कीच यासाठी आपण देखील तितकेच जबाबदार आहोत,
      सरकार हे आपणच निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे बनलेले आहे..
      अप्रत्यक्ष्यरित्या आपणही सरकार एवढेच जबाबदार आहोत…
      गरज आहे ती योग्य उमेदवाराला मत देण्याची…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here