Pavankhind: New Name for Digpal Lanjekar’s Jungjauhar – जंगजौहर आता आहे पावनखिंड.

0
147

दिगपाल लांजेकर हे नाव आता आपल्या सगळ्यांना परिचयाचे झाले आहे, याला कारण पण तसेच आहे, दिगपाल ने दिग्दर्शित केलेले आधीचे दोन चित्रपट.
फर्जंद आणि फत्तेशीकस्त, दोन्ही चित्रपट खूप गाजले, मराठी चित्रपट रसिकांना दोन्ही चित्रपट खूप आवडले.

Pavankhind: New Name for Digpal Lanjekar’s Jungjauhar – जंगजौहर आता आहे पावनखिंड.

तसे छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या मावळ्यांवर पूर्वी मराठीमध्ये अनेक चित्रपट आले. पण दिग्पालने पुन्हा एकदा २१व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांची कथा चित्रपट रसिकांना त्याच्या नजरेतून दाखवली.

फत्तेशिकस्त प्रदर्शित झाल्या नंतर काही महिन्यातच दिग्पालने याच मालिकेतील तिसऱ्या चित्रपटाचे नाव जंगजौहर जाहीर केले होते. या चित्रपटाची देखील सर्व चित्रपट प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच दिग्पालने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. सोबतच चित्रपटाचे नवीन नाव “पावनखिंड” जाहीर केले.

Marathi-Movie-Pavankhind

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमावर आधारित “पावनखिंड” हा मराठी चित्रपट १० जून २०२१ ला सर्व चित्रपटग्रुहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या नवीन नावाबरोबरच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ने चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडिया वर प्रकाशित केले. चित्रपटाची कथा हि १६६० सालातील आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या रक्तानी पावन झालेल्या पावनखिंडीची हि कथा आहे. त्यामुळे या चित्रपटातून १६६० सालातील युद्ध मराठी चित्रपट रसिकांना अनुभवता येणार आहे.

काहीदिवसांपूर्वीच दिग्पाल लांजेकर ने याच मालिकेतील चौथ्या चित्रपटाची देखील घोषणा केली होती, हा चित्रपट अफजल खानाच्या स्वारीवर आधारित असणार आहे, चित्रपटाचे नाव “शेर शिवराज है”.

Marathi-Movie-Sher-Shivraj-Hai

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here