Nothing सध्या Nothing Phone (1) च्या Lite variant वर काम करत आहे, ज्याचे नाव कदाचित Nothing Phone (1) Lite असू शकते .
Nothing ने काही आठवड्यापूर्वी त्यांचा पहिला स्मार्टफोन Nothing Phone (1) लाँच केला. जो मध्यम बजेट फोन आहे, आता Nothing याच फोन च्या Lite Variant वर काम करत आहे. आमच्या माहिती प्रमाणे या नवीन Variant मध्ये बर्याचश्या गोष्टी Nothing Phone (1) प्रमाणेच असतील पण Nothing Phone (1) चे वैशिष्ठये असलेले Glowing Back Panel यात असणार नाही. ज्याला कंपनी Glyph असे संबोधते. सोबतच वायरलेस चार्जिंग ची सुविधा यात असणार नाही. .
फोनमध्ये 120 हर्ट्झच्या स्क्रीन रिफ्रेश रेटसह 6.55 इंचाचा फुल HD+ OLED डिस्प्ले असेल आणि याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्लस चिपसेटमधून पॉवर मिळेल. शिवाय, यात 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा लेन्स आणि 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा लेन्स असेल.
Nothing Phone (1) Lite ला 42 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh बॅटरी असू शकते आणि Nothing Phone (1) Lite सोबत चार्जर सुद्धा कंपनी देऊ शकते. कंपनीच्या पहिल्या Nothing Phone (1) सोबत कंपनीने कोणताही चार्जर दिला नव्हता. Nothing Phone (1) Lite व्हेरिएंट Android 12 वर आधारित NothingOS वर चालेल आणि ते ब्लोटवेअर मुक्त असेल.
Buy Marathi Books online with Free Home delivery and Discount up to 20%
6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज क्षमता व्हेरिएंटसाठी फोनची किंमत सुमारे २०००० ते २२००० असू शकते. हा फोन भारतात सणासुदीच्या काळात अनावरण केला जाऊ शकतो आणि तो फ्लिपकार्टद्वारे विकला जाऊ शकतो. तथापि, UK स्थित कंपनीने Lite प्रकाराबद्दलच्या अफवांचे खंडन केले आहे.
Marathi Bloggers can join there Marathi Blogs on MarathiBlogs.in
[…] post Nothing Phone 1 चे लवकरच येणार Lite variant – Nothing Phone (1) Lite appeared first on […]
[…] Swapnil Samel – August 4, 2022 0 1 […]