MarathiBoli Competition 2016 – आयुष्य हे न उलगडलेले कोडे
आयुष्य हे न उलगडलेले कोडे, त्याला समजले तितके थोडे
कधी आनंद कधी दुख, कधी वाटेवरती फुल कधी काटे, काटयांना स्पर्शून फुल मिळे, आयुष्य हे न उलगडलेले कोडे
कधी हसू कधी आसू, कधी ऊन कधी सावली, उन्हातूनच सावलीची किम्मत कळे, आयुष्य हे न उलगडलेले कोडे
कधी उत्साह कधी नैराश्य, कधी खाच कधी खडगे, खाच खडग्यातूनच वाट मिळे, आयुष्य हे न उलगडलेले कोडे
आयुष्य हे न उलगडलेले कोडे त्याला समजले तितके थोडे…
…स्वाती वक्ते