MarathiBoli Competition 2016 – दुष्काळातील भेगा
त्या पाषाणी आंधळ्या विहिरी
तिच्या देहावरीच्या भेगा
ह्या संकटी विठ्ठल दर्शनी
व्याकुळली हि चंद्रभागा…
गिधाडांच्या बागा सजल्या
चातक हि विसरला रस्ता
ती गायी वासर निर्वसली
प्रेतांनी वसविल्या वस्त्या…
का त्याचेच नशीब फुटके
का त्यालाच उन्हाचे चटके
तो मुलखाचा अन्नदाता
का त्याच्याच उराला फटके…
फांद्यांना विरह हिंदोळ्याचा
दोऱ्यांचे काम बदलले नाही
होती सवय किलबिलाटाची
आता किंकाळ्यांचा आसरा….
भविष्याचेे डोळे पाणावले
तिथले भयानक दृश्य पाहून
अनेकांनी वर्तमान आवळले
कोरडल्या गळ्याचे माप घेऊन…
-अनंत (@nn@)