Marathi Movie Poshter Boys Song Lyrics – क्षण हे
पोश्टर बॉइज या मराठी चित्रपटातील “क्षण” हे या गाण्याचे बोल.
क्षण हे … अडवू कसे मी सांग ना..
मन हे..
वाटेवर विझले दिवे
जिव्हाळ्याचे तुटले दुवे
काळजात उरली आसवे…. ओ..
काळोख मिटतो जुना
आशेची किरणे पुन्हा
देऊन जाई चेतना …
देऊन जाई चेतना…
सरणार्या हळव्या क्षणी
पाठीशी अपुले कुणी,
जगण्याची मिळते प्रेरणा..
जगण्याची मिळते प्रेरणा..
क्षण हे … अडवू कसे मी सांग ना..
सरली …
नशिबाची काळी रात ही,
जीवनाची नवी वाट ही,
हृदयाला मिळे कुठली साद ही,
खडकाच्या वाटे वरी,
अंथरले काटे जरी,
झिजला ना पाठीचा कणा..
झिजला ना पाठीचा कणा..
लढण्याची चढते नशा,
जिंकून घे दाही दिशा,
उमटू दे विजयाच्या खुणा,
उमटू दे विजयाच्या खुणा..